नागरिकत्व कायदा विरोधात काढलेल्या आंदोलनास बीडमध्ये हिंसक वळण



माय अहमदनगर वेब टीम

बीड - सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शुक्रवारी आैरंगाबादसह हिंगाेली, परभणी आणि बीड जिल्ह्यांत उग्र आंदाेलने झाली. हिंगाेली, परभणी आणि बीड जिल्ह्यांत आंदाेलनाला हिंसक वळण लागले. जमावाने तुफान दगडफेक केली. काही ठिकाणी जाळपोळही झाली. कळमनुरी (जि. हिंगोली) येथे चार बससह एक अग्निशमन दलाची गाडी जमावाने फोडली. कळमनुरीत दगडफेकीत पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैजने आणि राखीव दलाचे दोन जवान जखमी झाले. बीडमध्ये दाेन माैलानांसह आठ पाेलिस कर्मचारी, दाेन हाेमगार्ड जखमी झाले. परभणीत दगड लागून तहसीलदार विद्याचरण कडवकर यांचा दात पडला. या तिन्ही जिल्ह्यांत शेकडो वाहनांची तोडफोड व वाहने उलथवून टाकण्यात आली आहेत.




बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निघालेला माेर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चाैकात येताच दगडफेक झाली. यात दाेन माैलाना, आठ पाेलिस कर्मचारी, दाेन हाेमगार्ड जखमी झाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post