झारखंडमध्ये भाजपला मोठा धक्का
माय अहमदनगर वेब टीम
रांची- महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर आता झारखंडमध्येही भाजपला मोठा झटका बसल्याचं दिसत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या सर्व 81 जागांचे कल हाती आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राजद यांची सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर यंदा स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप पक्ष 28 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय आजसूला 3, झारखंड विकास मोर्चा 4 आणि इतरांना 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.
झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान झालं होतं. एकूण 1216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बहुमतासाठी 41 जागांची गरज आहे. खरंतर पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याचा भाजपला विश्वास होता.
Post a Comment