मुंबई - ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 30 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. 29 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन-दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथविधीच्या 15 दिवसांनंतर मंत्रांना खातेवाटप करण्यात आले होते. आता सरकारस्थापनेच्या 1 महिन्यानंतर सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मानले जात आहे.
मंत्रिमंडळा विस्ताराच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोमवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात तासभर चर्चा केली. राष्ट्रवादीच्या सुत्रांनी सांगितले की, या बैठकीत काँग्रेसचे नेते हजर नव्हते. दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री विस्ताराने सांगणार असल्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले
.

Post a Comment