... तर पेट्रोल १० रुपयांनी स्वस्त होणार?


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : मोदी सरकार एका मोठ्या प्रकल्पावर काम करतंय. सरकारचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर पेट्रोल १० रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. एवढंच नाही तर तुमचा पेट्रोलवरचा खर्च १० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. यामुळे सरकारी खजिन्यात ५ हजार कोटींची बचत होईल. भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी हे मोठं पाऊल असेल.

सरकार देशभरात मिथेनॉल ब्लेंडेड इंधन आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिलं आहे. सरकारने हा निर्णय घेतला तर प्रदूषणात ३० टक्के घट होऊ शकते. मिथेनॉलची किंमत २० रुपये प्रतिलिटर आहे.

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी माहिती दिली आहे की यासाठी ६५ हजार किमी ट्रायल रन पूर्ण केली आहे.यासाठी पुण्यात मारुती आणि हुंदाई गाड्यांमध्ये मिथेनॉलयुक्त पेट्रोल टाकून ट्रायल रन करण्यात आली. यानंतर देशभरातल्या पेट्रोल पंपांवर मिथेनॉलयुक्त पेट्रोल मिळू लागेल.

सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं. इथेनॉल हे मिथेनॉलपेक्षा दुपटीने महाग असतं. मिथेनॉल कोळशापासून बनतं आणि इथेनॉल उसाच्या मळीपासून बनतं. सरकार मिथेनॉलची आयात करण्याचा विचार करतंय. चीन, मेक्सिको आणि मध्य पूर्वेच्या देशातून आयात केलं जातं. मिथेनॉलचा उपयोग स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून होऊ शकतो. या प्रयोगाची सुरुवात आसाममधून होऊ शकते. महागाईच्या दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना सरकारचा हा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post