माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नाशिककडे जाणार्या कारमध्ये अचानक बिघाड झाल्याने वेगात असलेली कार रस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात महिलेसह सात वर्षाची मुलगी जागीच ठार झाल्या असून अन्य चार महिला जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (दि.24) दुपारी संगमनेर शहराजवळील पुलाजवळ घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नगरहून शमीका जगदाळे, दिपाली जगदाळे, गिताली दिलीप दरंदले, संगीता दिलीप सोनवणे, इशिका मनोज भेकरे (वय 7), प्रिन्सेस दिलीप दरंदले असे नगरहून मारुती सुझुकी कार (क्र.एम.एच.16, बी.एच.3182) ने नगरहून भरधाव वेगात नाशिककडे जात असताना गाडीचा पाटा अचानक तुटल्याने गाडीच्या वेगावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात शमीका जगदाळे आणि इशिका भेकरे (मुळ रा.बुरुडगाव रोड, अ.नगर हल्ली रा.वाघोली पुणे) यांचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चार महिला या गंभीर जखमी झाल्या.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मात घटनेची नोंद केली आहे.
Post a Comment