माय अहमदनगर वेब टीम - अभिनेता सलमान खानसाठी आज दुहेरी आनंदाचा दिवस आहे. आज त्याचा वाढदिवस असून आजच तो पुन्हा एकदा मामा झाला आहे. त्याच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.त्याची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा ही दुस-यांदा आई झाली असून तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अर्पिताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मुलीचे नावदेखील जाहिर करण्यात आले आहे. अर्पिता आणि आयुष यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव 'आयत' असे ठेवले आहे. अर्पिता आणि आयुषवर सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय
चौथ्यांदा मामा झाला सलमान खान...
सलमान चौथ्यांदा मामा झाला आहे. त्याला अलविरा आणि अर्पिता या दोन बहिणी आहे. अलविराचे लग्न चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अतुल अग्निहोत्रीसोबत झाले आहे. अतुल-अलविरा यांना अयान हा मुलगा आणि अलिजा ही एक मुलगी आहे. तर अर्पिताला आहिल हा एक मुलगा आहे. आज तिने आयात या मुलीला जन्म दिला.
Post a Comment