सहल बसला अपघात; 15 विद्यार्थ्यांसह 3 शिक्षक जखमी
माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - संगमनेरच्या बी. जे. खताळ शाळेच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात शाळेचे 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बस चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
तळेगावजवळ सहलीच्या बसने ट्रॉलीला धडक दिल्याने हा अपघात घडला. बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला सहलीच्या बसची धडक बसल्याने हा अपघात घडला. या अपघातात चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे.
जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment