खा.राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा ब्राह्मण समाजाने घेतला समाचार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घरादारावर पाणी सोडत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. मात्र वारंवार काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहेत, त्यामुळे देशात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काँग्रेस करत आहे. राहुल गांधी यांनी महिलांबद्दल व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्थ आहे. राष्ट्र पुरुषांबद्दलचा त्यांचा अभ्यास कमी आहे, त्यामुळेच ते असे बेताल वक्तव्य वारंवार करत असतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव व इतर राज्यातून काँग्रेसची गेलेली सत्ता यामुळे राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन ढासळलेले असावे. राष्ट्र पुरुषांबद्दल वारंवार होणार्या बेताल वक्तव्याचा निषेध करुन परशुराम सेवा संघाने योग्य भुमिका घेतली आहे. निषेधापुरतेच न थांबता परशुराम संघाने राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी परशुराम सेवा संघाच्या नगर शाखेस दिला.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांनी भाषणातून महिला व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बेताल व्यक्तव्य केल्याचा निषेध करण्यासाठी नगरच्या परशुराम सेवा संघाच्या शाखेच्यावतीने निषेध सभेचे आयोजन सावेडी येथील पी.आर.कुलकर्णी यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी दिलीप गांधी बोलत होते. राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आबा एडके, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा शिल्पा सराफ, जिल्हा संघटक धनंजय गटणे, ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष राजाभाऊ पोतदार, जिल्हा संपर्कप्रमुख अजय कुलकर्णी, शहर सचिव गौरव देशपांडे, वृंदा कुलकर्णी, महिला शहराध्यक्ष स्वाती धनेश्वर, उपाध्यक्षा शिल्पा बेद्रे, जिल्हा सचिव विद्या कराळे, तुषार तांबोळी, चैतन्य वाळूंजकर, शर्मिला कुलकर्णी, सारिका रसाळ, संपत्ती शिंदे, विद्या कांबळे, रुपाली देशपांडे, स्मीता भोंग, वृषाली कुलकर्णी, वैभव निसरगंड आदिंसह भाजपाचे ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी उपस्थित होते.
प्रास्तविकात आबा एडके म्हणाले, राहुल गांधी यांना भारतीय परंपरेचे संस्कृतीचे तसेच देशाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या कार्याबद्दल कोणतेही ज्ञान नाही, अशी व्यक्ती पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहे, हे आपले दुर्दैव. परशुराम सेवा संघ अशा अज्ञानी नेत्यांचे वक्तव्य कदापी सहन करणार नाही. त्यांनी आपल्या वाणीला लगाम घालावा, अन्यथा परशुराम सेवा संघ राज्यभर तीव्र आंदोलन करेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रसाद कुलकर्णी यांनी मानले.
Post a Comment