माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर– मागील ७ वर्षांपासून विविध स्तरावर पाठपुरावा करूनही सावेडी गावठांचा सिटी सर्व्हे होऊ शकला नाही. त्यामुळे सावेडी गावठाणातील नागरिकांची मालमत्ता संदर्भातील कामे रखडली आहेत. त्याबरोबर सावेडी गावठाण आणि वैदुवाडीचा विकास खुंटला आहे. सिटी सर्व्हेचे काम त्वरित सुरु करावे अन्यथा परिसरातील नागरिकांना घेऊन भूमिअभिलेख कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात नगरसेविका सौ. आशाताई कराळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दि.१३ जिल्हाधिकारी आणि भूमिअभिलेखचे उपअधीक्षक गजानन पोळ यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी रुख्मिणी वाकळे, ज्योती लबडे, नंदा दंडवते, सुनिता कराळे, शीला बारस्कर, बबन बारस्कर, ज्योती कराळे, पार्वती दंडवते, महेश कराळे, कंचन गडाख आदी उपस्थित होते.
सदर निवेदनात म्हटले आहे की उपनगर सावेडी चांगल्या प्रकारे विकसित झाले आहे. परंतु सावेडी गावात मात्र सिटी सर्व्हे न झाल्याकारणाने नागरिकांचा व गावचा विकास खुंटला आहे. मी व विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे सभापती असतांना जवळपास १९ लाख रु. महानगरपालिकेतून सिटी सर्व्हे करण्याकरिता वर्ग केले होते. परंतु सिटी सर्वे होऊ शकले नाही. तसेच सिटी सर्व्हे नसल्या कारणामुळे आम्हाला गावकऱ्यांना प्रॉपटी कार्ड( सात बारा) मिळत नाही. त्यामुळे आमच्या सावेडी गावातील नागरिकांचा विकास खुंटला आहे. लोन (कर्ज) मिळत नाही. सिटी सर्व्हे नसल्याने अंतर्गत रस्त्याच्या ह्दीचे व घरांचे मोजमाप मिळत नाही. त्यामुळे अतिक्रमण होते व रस्ते छोटे होत जातात. तरी लवकरात लवकर आमच्या सावेडी गावठाण व वैदुवाडीचा चालू असलेल्या शासनाच्या योजनेतून सिटी सर्व्हे व्हावा अन्यथा नागरिकांसह मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका अशा कराळे यांनी दिला.
Post a Comment