नागरिकत्व कायद्यामुळे सामाजिक-धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता - शरद पवार


माय अहमदनगर वेब टीम
पुणे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत नागरिकत्व कायद्यावर भाष्य केले. नागरिकत्व कायद्यामुळे सामाजिक-धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 3 देशातील एनआरआय नागरिकत्व देण्याची सरकारची खेळी आहे. देशातील आर्थिक स्थितीवरील लक्ष हटवण्यात येत असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान श्रीलंकेतून आलेल्या तमिळ लोकांचा सरकार विचार का करत नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला. सरकारने फक्त तीन देशांव्यतिरिक्त बाकिच्यांचा का केला नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

याच पत्रकार परिषदेत त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाचाही उल्लेख केला. याप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळमधून अनेक लोक येतात. पुणे शहरातही अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये नेपाळी काम करतात. दिल्लीत माझ्या सरकारी घरामध्ये दोन नेपाळी लोक माझं घर सांभाळतात. गेल्या ३० वर्षांपासून जास्त काळ ते काम करत आहेत. तसंच माझ्याकडेच नाही तर अनेक संस्थांमध्ये नेपाळी लोक पहारेकरी म्हणून काम करत आहे.

सध्याच्या घडीला देशात जे वातावरण आहे ते देशाची जी अर्थव्यवस्था संकटात आहे त्यापासून लक्ष वेधलं जातं आहे म्हणून निर्माण केलं गेलं आहे का? असा प्रश्न पडला आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात हा उद्रेक पोहचेल असं वाटलं नव्हतं. मात्र देशात जे वातावरण निर्माण झालं आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. देशातल्या आठ राज्यांनी आम्ही CAA आणि NRC लागू करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. बिहारमध्ये भाजपाच्या पाठिंब्यावर नितीशकुमार यांचं सरकार आहे. नितीशकुमार सरकारनेही हीच भूमिका घेतली आहे असंही पवार यांनी सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post