'मराठा क्रांती मोर्चा व शेतकरी संप आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या'


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मराठा क्रांती मोर्चा व शेतकरी संप आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत या मागणीसाठी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्यसमन्वयक संजीव भोर पाटील यांनी कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली व लेखी निवेदनही दिले. नाणार प्रकल्प व आरे कारशेड विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून याप्रमाणेच मराठा आरक्षण आंदोलन व शेतकरी संप आंदोलनातील गुन्हेही सरसकट मागे घेण्यात यावेत अशी मागणी संजीव भोर यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच ना.बाळासाहेब थोरात यांनाही देण्यात आले आहे.

यावेळी संजीव भोर यांचे समवेत सचिन चौगुले, माणिक काचोळे व मदन मोकाटे हेही उपस्थित होते.

मराठा व शेतकरी कार्यकर्त्यांवरील आंदोलनातील गुन्हे अन्यायकारक असून याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन ना.जयंत पाटील यांनी दिले आहे. यावेळी कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल ना.जयंत पाटील यांचा संजीव भोर यांनी सत्कार केला. समाज स्तरावर ज्याप्रमाणे तुम्ही जोरदार काम करीत आलात तसे आता राष्ट्रवादी पक्षातही जोमाने काम करा अशी सूचनावजा अपेक्षा नामदार जयंत पाटील यांनी यावेळी संजीव भोर यांचेकडे व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post