मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मुदगल तर गिते व्हाईस चेअरमन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बाबासाहेब भिमराज मुदगल, व व्हा.चेअरमन पदी विकास भानुदास गिते यांची मंगळवारी (दि.२४) दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पतसंस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळ सभेत ही निवड करण्यात आली. सदरची सभा जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक व्ही. के. मुटकुळे, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चेअरमन पदासाठी बाबासाहेब मुदगल यांचे नांव बाळासाहेब गंगेकर यांनी सुचविले त्यास विलास सोनटक्के यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी विकास गिते यांचे नांव श्रीधर देशपांडे यांनी सुचविले, त्यास बाळासाहेब पवार यांनी अनुमोदन दिले. मावळते चेअरमन किशोर कानडे यांनी नवनिर्वाचित चेअरमन बाबासाहेब मुदगल यांचा व मावळते व्हा.चेअरमन सतिश ताठे यांनी नवनिर्वाचित व्हा.चेअरमन विकास गिते यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक सर्वश्री. जितेंद्र सारसर, विलास सोनटक्के, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, प्रकाश अजबे, कैलास भोसले, अजय कांबळे संचालिका नंदा भिंगारदिवे, सौ. चंद्रकला खलचे, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी, सह व्यवस्थापक राजु गंधे हे उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांनी सर्व संचालक मंडळाचे हार्दिक आभार मानले. तसेच संस्थेचे कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
Post a Comment