प्रत्येक प्रभागात उद्याने करून खेळणी बसवणार



महापौर बाबासाहेब वाकळे ; महालक्ष्मी उद्यानात ओपन जिम व खेळणीचे उद्घाटन

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- नगर शहरातील ओपन स्पेसचे सुशोभिकरण करुन शहराच्या वैभवात भर घालण्याचे काम करणार आहे. प्रत्येक प्रभागात लहान मुलांसाठी खेळणी व महालक्ष्मी उद्यानाचे नूतनीकरण करुन सुंदर, स्वच्छ बाग करण्याचे काम करणार आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली.

नगरसेविका वंदना विलास साठे यांच्या प्रयत्नातून महालक्ष्मी उद्यान बालिकाश्रम रोड येथे ओपन जिम व खेळणीचे उद्घाटन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका वंदना ताठे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, उदय कराळे, ऍड. सुनील सुर्यवंशी, संजय बिजेन, राजेंद्र ताठे, मच्छिंद्र टेमकर, संतोष उंडे, दीपक खोकर, अरुण शिंदे, योगेश ताठे, आशिश भगत, प्रशांत ताठे, मयुर पडोळे, ऋषिकेश ताठे, निखील ताठे, शशिकांत नजन, बि‘जेश ताठे, संकेत ताठे, राहूल ताठे, ओंकार ताठे, अक्षय बारवकर आदी उपस्थित होते.

महापौर वाकळे पुढे म्हणाले, नगर शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे. नागरिकांच्या मुलभूत सुविधांबरोबरच, स्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे. शहराच्या विकासाचे नियोजन करुन विकास आराखड्याप्रमाणे कामे केली जाणार आहे. विकासकामे दर्जेदार होण्यासाठी आमचे बारीक लक्ष आहे. एकच काम पुन्हा पुन्हा करण्याची गरज पडणार नाही असे काम आम्ही शहरात उभे करू, असेही ते म्हणाले.

नगरसेविका वंदना ताठे म्हणाल्या, ओपन जिमच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल. महालक्ष्मी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच बरोबर लहान मुलांसाठी खेळणी बसविण्याचे काम केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post