मुलीवर अत्याचार; पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न


माय अहमदनगर वेब टीम

नाशिक- मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची तक्रार ग्रामीण पोलीस दाखल करून घेत नसल्याने न्यायासाठी बापाने उपोषणाचा मार्ग अवलंबला. दरम्यान, घटनेनंतर चौथ्या दिवशी गुन्हा दाखल केला खरा मात्र, अत्याचार झालाच नसल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. यामुळे व्यथित झालेल्या पित्याने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पित्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

सिन्नर तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. मात्र, संशयित मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने मुलीच्या वडिलांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे उपोषणाचा मार्ग अवलंबला. विशेष म्हणजे, उपोषणाला बसण्यासाठी घरावरचे पत्रे या पित्याने विकले असल्याचे समजते.
दरम्यान पीडित मुलीच्या पित्याने आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हाताच्या नसा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या या पित्याला तत्काळ जवळील रिक्षाचालकांनी उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post