'बाप्पा' कामचं झालं ना...! सचिन जाधव यांचा 'तो' व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय



माय अहमदनगर वेब टीम
माय नगर @ निलेश आगरकर

जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी शांततेत मतदान झाले. दरम्यान मतदानावेळी शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. अशातच विद्यमान नगरसेविका जाधव यांचे पती माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी आपल्या फेसबुक अकाऊंट वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ नगर शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला असून या व्हिडीओ मध्ये नगरसेवक अनिल शिंदे यांचा फोटो टाकण्यात आला आहे. तसेच 'बाप्पा कामाचं झालं ना' असे म्हटले आहे. नगरसेवक अनिल शिंदे हे बाप्पा नावाने परिचित आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2618928178203639&id=100002594465310&sfnsn=wiwspwa&extid=EdA2n1uxrlyylJ5n&d=w&vh=i

जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी 67 नगरसेवकांनी मतदान केले. निवडणूक मतदान प्रक्रिया महासैनिक लॉन येथे पार पडली. अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची निवडणूक प्रक्रिया ही 12 डिसेंबरपासून सुरू झाली होती. या निवडणुकीमध्ये महापालिका कोट्यातील तीन जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर तीन जागेपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने फक्त दोन जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे व ज्ञानेश्वर येवले या दोघांमध्येही लढत झाली. तर नागरीकांचा मागास प्रवर्ग मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे व शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांमध्ये हे लढत झाली. या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा निकाल 26 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशीच दुपारी माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी फेसबुक पोस्टवर एक व्हिडीओ टाकला आहे. त्या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे की,


बाप्पा कामच झालं ना...
लाईन बसून गेली ना...
बाप्पा कामच झालं ना...
उलटे फिरले वारे...
बदलुन गेले गृह तारे...
झाडे बदलले, पक्षी फिरले...
भोई वाटा, शाळा, पाट्या बदलल्या...
आपण कुणाला बांधील नाय...
सळकाळाचा सवाल नाय....
असे म्हटले आहे.

आज झालेल्या मतदानाचा निकाल 26 डिसेंबरला जाहीर होणार आहे, असे असतांना हा व्हिडीओ बसपाच्या नगरसेविका जाधव यांचे पती माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी पोस्ट केल्याने नगरसेवक अनिल शिंदे एकप्रकारे विजयी झाल्याचं बोललं जातं आहे. तसेच या व्हिडीओ मधून शिंदे यांनी नगरमधील शिवसेनेच्या नेत्यांना धक्का दिल्याचे बोलले जात असून त्यांना 55 ते 57 मते मिळतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post