भिस्तबागजवळ एकास लुटले ; आरोपी काही तासांत गजाआड


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : भिस्तबाग महालाजवळून जाणाऱ्या एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करून लुटण्याची घटना घडून काही तासांच्या कालावधीतच या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. शरद सोपान पवार (वय २१ वर्षे रा.चेतना कॉलनी,खंडोबा मंदिर नागापूर), विजय भगवान कुऱ्हाडे (वय १९ वर्षे,राग़ांधीनगर मारूती मंदिराजवळ, बोल्हेगाव) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महेश सुधाकर कुलकर्णी (रा.गरवारे कॉलनी, ढवणवस्ती) हे काल रात्री आठ वाजता भिस्तबाग महालाजवळून चालले होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोनजण आले. त्यांनी महेश कुलकर्णी यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल हँडसेट हिसकावून घेतला. कुलकर्णी यांनी आरडाओरड केली परंतु मदतीला येण्यापूर्वीच चोरटे पसार झाले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा तपास शहर विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुलाणी व त्यांच्या पथकातील कर्मचारी करत होते. यावेळी त्यांना सदरचा गुन्हा हा शरद सोपान पवार व विजय भगवान कुऱ्हाडे या दोघंानी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील पोलिस अधिकारी व सहायक पोलिस निरीक्षक सुरसे, पोना.इनामदार, पोना.पठाण, पोना.बडे, पोकॉ.जगताप आदंीनी खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला असता. वरील पत्यावर दोघेही आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली.तसेच चोरी केलेला मुद्देमाल सॅमसंग कंपनीचा मोबाईल,५०० रूपये रोख रक्कम,गुन्ह्यासाठी वापरलेली एचएफडिलक्स मोटारसायकल (एमएच १६बीएक्स २४७८) आदी वस्तू ताब्यात घेतल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post