जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीस मिळाला 'हा' पुरस्कार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – दिवसेंदिवस न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ होत असल्याने न्यायव्यवस्थेवर ताण वाढत आहे. त्यामुळे अशा लोकन्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे मार्गी लागण्यासाठी न्यायाधीश, वकील व पक्षकर एकत्र येऊन प्रयत्न करतात. सर्वांच्या सहकार्याने लोकन्यायालय यसस्वी होत आहेत. नुकत्याच झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीला सर्वात स्वच्छ व सुंदर इमारत म्हणून गौरवले गेले असून पुरस्कारही देण्यात आला आहे. या लोकन्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी सर्वांना ही गोड बातमी देतांना मला आनंद होत आहे. सर्व न्यायाधीश, वकील व पक्षकर नागरिक यांच्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वांनी इमारती बरोबरच न्यालायाचा परिसरही असाच स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.
जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाच्या जनजागृतीच्या ‘नालसा’ गीताने या लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, न्या. ए.एम.शेटे, विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सुजितजीत पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, उपाध्यक्ष ॲड. सुहास टोणे, सेंट्रल बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. समीर सोनी, प्राधिकरणाचे अधिक्षक विलास जोशी आदींसह सर्व न्यायिक अधिकारी, प्राधिकरणाचे सदस्य, वकील व पक्षकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.सुनीलजीत पाटील म्हणाले, पक्षकारायचा वेळ पैसा वाचून वर्षानुवर्ष प्रलंबित खटले लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी लोकअदालत ही संकल्पना राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाने सुरू केली आहे. विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून काम करताना खटलापूर्व व प्रलंबित जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी प्राधान्य देत आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यासाठी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करत आहेत.
ॲड. भूषण बऱ्हाटे म्हणाले, लोकन्यायालया द्वारे जास्तीत जास्त प्रकरणे मिटली जात असल्याने जास्तीत जास्त पक्षकरांनी लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे सांगून जास्तीत जास्त प्रकरणे मिटवण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अमोल धोंडे यांनी केले. आभार ॲड. विक्रम वाडेकर यांनी मानले. या लोकन्यायालयास मोठ्या संख्येने जिल्ह्यातून आलेले पक्षकर उपस्थित होते. राष्ट्रीय लोकन्यायालया यसस्वी होण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, विधिज्ञ, बँक अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, विजवितरण कंपनी अधिकारी, विधिसेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment