जिल्हा कारागृहाच्या गेटवर दगडफेक


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील मध्यवर्ती भागातील जिल्हा कारागृहाच्या मुख्य दरवाजावर तिघांनी दगडफेक करुन मोठमोठ्याने आरडा-ओरडा केल्याची घटना मंगळवारी (दि.24) पहाटेच्या 12.45 च्या सुमारास घडली.

शहरातील सबजेल चौकात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य दरवाजाजवळ पहाटेच्या सुमारास तिघांनी येवून तेथे दगडफेक केली व मोठ-मोठ्याने आरडाओरडा केला. व झाडाभोवती असलेली जाळी तोडून नुकसान केले. यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस शारदा वाघमारे यांनी पाहिले असता जेलमधून सुटलेला कैदी महेश महारुद्रा बागले (रा.कुंभारगल्ली, नालेगाव) व त्याचे दोन अनोळखी साथीदार असल्याचे त्यांना दिसले.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पो.कॉ. शारदा तुकाराम वाघमारे (वय 41, रा.जिल्हा कारागृह, जेल क्वॉर्टर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 336, 427, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो.ना.निपसे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post