माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरासह उपनगरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून चोरी, घरफोडी, गंठण चोरी, जबरी चोरी या सारख्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये चोरट्यांच्या भिती निर्माण झाली असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच चोरट्यांचे फावले असल्याने घरफोडी व चोरी करणार्या गुन्हेगारांचा शहर व परिसरात सुळसुळाट झाला आहे. मंगळवारी (दि.24) या दिवशी तोफखाना पोलीस ठाणे, कोतवाली, नगर तालुका या ठिकाणी घरफोड्यांचे चार गुन्हे, चोरीचे 4 गुन्हे दाखल झाले आहेत.
बालिकाश्रम रोड दोन ठिकाणी घरफोडी
बंद असलेल्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 5 लाख 74 हजार 275 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवार (दि.20) सकाळी 9 ते मंगळवार (दि.24) सकाळ 8 च्या दरम्यान बालिकाश्रम रोडवरील लेंडकर मळा, एकदंत कॉलनीत घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रविण विजयकुमार पेंडसे (वय 57, रा. नवश्री बंगला, एकदंत कॉलनी, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, नगर) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोराने घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 5 लाख 74 हजार 275 रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी प्रविण पेंडसे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.
बालिकाश्रम रोडला घरफोडी
बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कॅमेरा असा एकूण 28 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 17 डिसेंबर सायंकाळी 7 वाजल्यापासुन ते सोमवार (दि.23) रात्री 8 च्या सुमारास बालिकाश्रम रोडवरील आर्चित अपार्टमेंट गीते हॉस्पिटलजवळ घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, दत्तात्रय चंदक्रांत आंदुरे (वय 35, रा. आर्चित अपार्टमेंट, गीते हॉस्पिटलजवळ, बालिकाश्रम रोड) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोराने हे चोरी केली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दत्तात्रय आंदुरे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गाजरे हे करीत आहेत.
केडगावात घरफोडी
बंद असलेल्या घराचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील 600 रूपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि.24) पहाटे 2 च्या सुमारास केडगाव परिसरातील नाजरिन चर्चच्या मागे याव्हे शाम्मा बिल्डींगमध्ये घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मार्विन चार्ल्स मकवान (वय 62, रा. याव्हे शाम्मा बिल्डींग, नाजरिन चर्चमागे, केडगाव) यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील 600 रूपये रोख चोरून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मार्विन मकवान यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 457, 380, 427 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास हे.कॉ. बाबासाहेब इखे हे करीत आहेत.
भुषणनगरला घरफोडी
बंद असलेल्या घराच्या किचनच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील टायटन घड्याळ व रोख रक्कम असा एकूण 10,500 रूपयांचा ऐवज चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि.24) पहाटे 5 च्या सुमारास केडगाव परिसरातील भुषणनगर येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, विठ्ठल नानाभाऊ सातपुते (वय 43, रा. भुषणनगर, केडगाव) यांच्या घराच्या किचनचा दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील 10 हजार रूपये किंमतीचे टायटनचे घड्याळ व 500 रूपये रोख चोरून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी विठ्ठल सातपुते यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 457, 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक डोळे हे करीत आहेत.
उघड्या घरातुन चोरी
घराच्या उघड्या दरवाजातुन आत प्रवेश करून अज्ञात चोराने आत प्रवेश करून रोख रक्कम व दागिने असा सुमारे 41 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.24) रात्री 3 च्या सुमारास सोलापुर रोडवरील पारगाव फाटा येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, त्रिंबक तुकाराम नेटके (वय 55, रा. पारगाव फाटा, ता. नगर) यांच्या उघड्या घराच्या दरवाजातुन आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 41 हजारांचा ऐवज चोरून नेला.
Post a Comment