कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये प्रसुति सुविधा सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भिंगारमधील कॅन्टोन्मेंटच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये प्रसुति करण्याची सुविधा गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे याठिकाणी तातडीने प्रसूती सुविधा सुरु करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची शिष्टमंडळाने भेट घेवून चर्चा केली. तसेच याबाबत निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा शहर संघटक मतीन सय्यद समवेत सौ.तसलीम सय्यद मतीन, साजेदा शेख, यास्मीन सय्यद, आयशा शेख, कदिर शेख, शहानवाज काजी, शाकीर शेख, मुजाहिद सय्यद, अवेज शेख, आमान शेख, शहबाज शेख, मुनव्वर सय्यद आदींसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, दोन वर्षापासून भिंगार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे महिलांची प्रसूती सुविधा बंद आहे. त्यामुळे भिंगारमधील गोरगरीब महिलांना नगर येथे जावे लागत आहे रात्री-अपरात्री महिलांना वेदना झाल्यास भिंगारमधून नगरमध्ये जाण्यास कोणतेही साधन मिळत नाही. त्यामुळे महिलांची हेळसांड होते आणि कधीकधी रिक्षामध्ये प्रसूती होते व दवाखान्यामध्ये अॅम्ब्युलन्स उपलब्ध असून त्याला चालवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाही यामुळे ही बाब आपल्यासाठी खूप गंभीर आहे. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल हे प्रसूतीसाठी नावाजलेले होते पण आपल्या येथे चांगले डॉक्टर असताना कोणतेही कारण नसताना प्रसूती सुविधा बंद करण्यात आली व भिंगारमधील महिलांना नगरमध्ये प्रसुतीसाठी जावे लागते ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. भिंगारमध्ये दोन महिला सदस्या असून त्यांनी आतापर्यंत या गोष्टीकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही व पाठपुरावा केलेला नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आम्ही प्रश्न मांडत आहोत व भिंगारमधील गोरगरीब महिलांना सरकारी रुग्णालय सोडून खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यात जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे ताबडतोब हॉस्पिटलमध्ये प्रसुती सुविधा सुरु करण्याची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment