चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याने वायरमनला लोखंडी गजाने धुतले
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातून दोघांनी वायरमन व त्यांच्या साथीदारांना लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बोल्हेगाव परिसरात काल सायंकाळी ही घटना घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुनील नारायण तांबे, निरज सुनील तांबे (दोघे रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून शासकीय सेवकास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत सचिन बाळासाहेब बोरुडे (रा. शंभूराजे चौक, बोल्हेगाव, नगर) व रवी कराळे हे दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, सुनील तांबे यांनी चोरून वीज कनेक्शन घेतले होते. सदरचे वीज कनेक्शन वायरमन सचिन बोरुडे व त्यांच्या साथीदारांनी तोडून टाकले. चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातून सुनील तांबे व त्यांच्या मुलाने लोखंडी गजाने वायरमन बोरुडे व त्यांच्या जोडीदारास मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम चोप देऊन जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सचिन बोरुडे यांच्या फिर्यादीवरून तांबे पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.
Post a Comment