शिर्डीत गावठी पिस्तुलासह दोघांना अटक
माय नगर वेब टीम
शिर्डी - शिर्डी शहरातील 1000 रुम परिसराच्या मागे संशयितरित्या फिरत असताना दोघा जणांना पोलिसांनी पकडून त्यांची अंगझडती घेतली. त्यात पोलिसांनी एक गावठी बनावटीचा पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात या तिघाही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असून त्या अनुषंगाने शिर्डी शहरातील अग्निशस्त्र व हत्यारे यांचा पोलिसांनी शोध सुरु केला. त्यात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिर्डी शहरातील एका इसमाकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती मिळाली.

Post a Comment