महापालिकेत 9 कर्मचार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या


माय नगर वेब टीम

अहमदनगर- महानगरपालिकेच्या नगरचनाकार विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या 9 कर्मचार्‍यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी काढले आहेत.

आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रदीप पठारे यांनी एकूण 18 कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले. त्यामध्ये नगरचनाकार विभागातील 9 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यामध्ये गणेश क्यात, सतिष दारकुंडे, श्रीकांत दरेकर, किशोर जाधव, प्रवीण नेमाणे, सुधीर सुळ, जितेंद्र सासवडकर, संजय चव्हाण, अंकुश कोतकर यांचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post