हॉटेल संचालकांनी ओयोवर कमिशन वाढवण्यासह केले अनेक आरोप






माय नगर वेब टीम
नवी दिल्ली -ओयो हॉटेल्स अँड होम्स विदेशांमध्ये विस्तारासाठी दीड अब्ज डॉलर (१०६५० कोटी रु.) जमा करणार आहे. सिरीज-एफ फंडिंगअंतर्गत आरए हॉस्पिटॅलिटी होल्डिंग्ज आेयोमध्ये सुमारे ७० कोटी डॉलरची गुंतवणूक करतील.उर्वरित ८० कोटी डॉलर ओयोचे सध्याचे गुंतवणूदार आणतील. ही रक्कम अमेरिकेत व्यवसाय विस्तार आणि युरोपमध्ये व्हॅकेशन रेंटल बिझनेस बळकटीसाठी वापरली जाईल. कंपनीने सोमवारी ही माहिती दिली. भारतीय हॉटेल संचालक आेयोवर कमिशन व नियमांच्या उल्लंघनाचा आरोप आहे.
सॉफ्टबँकद्वारे गुंतवणूक केलेल्या ओयो हॉटेल्स अँड होम्सवर भाारतीय हॉटेल संचालन एकतर्फी शुल्कवाढीचा आरोप ठेवत आहे. आेयोच्या महसुलावर सुमारे २०% फ्रँचायझी शुल्क घेते. मात्र, काही भारतीय हाॅटेल संचालकांच्या म्हणण्यानुसार, अचानक कंपनी शुल्काच्या माध्यमातून निम्मे किंवा त्यापेक्षा जास्त महसूल घेते. रॉयटर वृत्तसंस्थेनुसार, कर्नाटकच्या दोन हॉटेल व्यावसायिकांनी आेयोवर फसवणूक करून वाढत्या कमिशनचा आरोप केला आहे.
३ वर्षांपूर्वी ७ हजार डॉलरचा नफा होता, आता नुकसान
रॉयटरने २२ हॉटेल मालक आणि व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी आेयोप्रति असंतोष वाढला आहे. अनेक हॉटेल समूहांनी विरोध केला.बंगळुरूचेहॉटेल व्यावसायिक विक्रांत सिंह म्हणाले, त्यांनी ५० खोल्यांच्या हॉटेलने २०१६ च्या जानेवारी महिन्यात ४.५८ लाख रुपयांचा मासिक नफा कमावला. मात्र, जानेवारी २०१९ मध्ये १.४० लाखाहून जास्त जास्तीचे नुकसान झाले.
ओयोनेगेल्या वर्षीही १ अब्ज डॉलरचा निधी जमा केला
ओयोने विस्तारासाठी गेल्या वर्षीही एक अब्ज डॉलर रुपयांचा महसूल जमा केला होता. कंपनीने सॉफ्टबॅक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सच्या(एसबीआयए) नेतृत्वाखाली सॉफ्टबॅक व्हिजन बँकेद्वारे ही रक्कम जमा केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post