माय नगर वेब टीम
दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरात १७ वर्षांपूर्वी लहानपणी विभक्त झालेल्या दाेन बहिणींची एका सेल्फीमुळे पुनर्भेट घडली. जन्मानंतर तीनच दिवसांनी दुसऱ्या मुलीची नर्सने चाेरी केली हाेती. मात्र, याेगायाेगाने माेठ्या झाल्यावर या दाेघीही एकाच शाळेत शिकू लागल्या. वर्गमित्र नेहमीच म्हणायचे, तुम्ही किती सारख्या दिसता. काही दिवसांनी या दाेघांनी एक सेल्फी घेऊन ती साेशल मीडियावर पाेस्ट केली. यानंतर दाेघींमधील नाते समाेर आले.
पहिली मुलगी मिशे तीन वर्षांची हाेती तेव्हा ३० एप्रिल १९९७ राेजी केपटाऊनचे शासकीय रुग्णालय ग्रोट श्योर येथे सेलेस्टे यांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. मात्र ही मुलगी तीन दिवसांची असताना नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने या चिमुकलीची चाेरी केली. सेलेस्टेने पाेलिसात तक्रार दिली, मात्र चिमुकली काही सापडली नाही. २० वर्षीय मिशे ज्वानस्वाक शाळेत शिकत होती, तेव्हा त्याच शाळेत तिची बहीण कॅसिडीने अॅडमिशन घेतले. नेहमीच त्या एकमेकींना भेटायच्या. वर्गमित्र म्हणायचे, 'तुमच्यात तीन वर्षांचे अंतर असले तरी तुम्ही किती सारख्या दिसता.' मिशे हिने हे हसण्यावर नेले. मात्र जेव्हा दाेघींची भेट व्हायची तेव्हा त्यांनाही काहीतरी जाणवायचे. त्यांच्यात मैत्रीही वाढली हाेती. एक दिवस मिशे हिने कॅसिडीसाेबत सेल्फी घेतली व मित्रांना दाखवली. तर ते म्हणाले, 'तुम्ही जणू बहिणीच आहात.' मिशेने हे फाेटाे आई-वडिलांना दाखवले. तिची आई म्हणाली, 'ही तर आमच्या हरवलेल्या मुलीसारखीच आहे.' तेव्हा मिशेला खरी घटना कळली व दाेघींच्या नात्याचा खुलासा झाला. मिशेच्या माता-पित्यांनी कॅसिडीला विचारले, 'तुझा जन्म ३० एप्रिल १९९७ चा आहे का?' तिने हाे म्हटले. मग त्यांनी पाेलिसात धाव घेतली. डीएनए चाचणीही झाली. पाेलिसांनी कॅसिडीची आई लोनोवा हिला अटक केली. मात्र कॅसिडीला यावर विश्वास बसेना. कारण तिचे पालनपाेषण आईने राजकुमारीप्रमाणे केले हाेते. मात्र तिच्या जन्म प्रमाणपत्रावर रुग्णालयाचे नाव बदलण्यात आले हाेते. लाेनाेवाला मूल हवे हाेते, मात्र तिचा गर्भपात हाेत हाेता. त्यामुळे तिने बाळाची चाेरी केल्याचे काेर्टात सांगितले. काेर्टाने तिला १० वर्षांची शिक्षा सुनावली. आता जन्म देणाऱ्या पालकांसाेबत राहावे की आईची तुरुंगातून सुटका हाेण्याची प्रतीक्षा करावी, या संभ्रमावस्थेत लाेनाेवा हाेती. कारण तिला तीन छाेटे लहान भाऊ-बहीण आहेत. वडील घटस्फाेट घेऊन वेगळे राहतात. अखेर कॅसिडी आपल्या नातलगांकडे राहण्यास गेली.

Post a Comment