आयुर्विमा क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी


माय नगर वेब टीम

नवी दिल्ली : भारताच्या जीडीपीत आयुर्विम्याचा वाटा केवळ ३.४% आहे. विमा क्षेत्रातील विस्तारासाठी खूप संधी आहेत, हे यामागचे कारण आहे. खासगी क्षेत्रालाही आयुर्विम्यात व्यवसाय करण्यास परवानगी मिळणे आणि एफडीआय मर्यादेस ४९ टक्क्यापर्यंत घेऊन गेल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. नोकरी व करिअर विकासावरून श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनीचे एमडी मनोज जैन यांच्याशी केलेल्या चर्चेतील अंश...

सद्य:स्थितीत तरुणाईसाठी आयुर्विम्यात कोणत्या प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत? आमच्याकडे संपूर्ण भारतात आयुर्विमा उत्पादन विक्रीसाठी व्यक्तींसाठी चांगल्या संधी आहेत. आम्ही दर महिन्यास कमीत कमी १०० व्यवस्थापकांची भरती करत आहोत. किमान शैक्षणिक पात्रता बारावी आहे.
या श्रेणीत नव्या आणि अनुभवी व्यावसायिकांसाठी कोणत्या संधी आहेत? आमच्याकडे फ्रेशर आणि अनुभवी व्यावसायिक दोघांनाही खूप संधी आहेत. आमच्याकडे अशा फ्रेशर्सची उदाहरणे आहेत जे फ्रंटलाइन मॅनेजरपासून मॅनेजर्सपर्यंत आपल्या कामगिरीमुळे पाेहोचले आहेत.

तुमच्या कंपनीत कोणत्या कोणत्या प्रकारच्या कौशल्याच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते? आमच्याकडे ऑपरेटिंग, कस्टमर सर्व्हिस, फायनान्ससारखी अन्य प्रमुख कामे आहेत. तरीही आमचे मुख्य काम विक्रीशी जोडले आहे. आमचे ८५% कर्मचारी विक्री विभागात आहेत. त्यामुळे नियमित आधारावर फ्रंटलाइन मॅनेजर व विकास अधिकाऱ्यांची भरती करतो. भरतीवेळी कर्मचाऱ्यांमध्ये कमिटमेंट, कनेक्ट आणि कम्युनिकेशनची पारख करतो. व्यवस्थापकांची भरती स्थानिक स्तरावर करतो. कर्मचाऱ्यांना स्थानिक भाषेत संवाद करण्यात सक्षम असायला हवे.

मुलाखतीसाठी कशी तयारी केली पाहिजे? आमची एचआर टीम उमेदवारांना कंपनीबाबत, कंपनीचे सिद्धांत, नोकरीची भूमिका व जबाबदाऱ्या सांगते. मूल्यांकन प्रक्रियेत उमेदवाराच्या बलस्थानावर आमचा भर असतो. उमेदवाराने कंपनीसोबत कठोर मेहनत करणे व स्वत:च्या विकासासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे.
तुमच्या कंपनीत कर्मचाऱ्यांमध्ये उद्यमशीलतेचे काय धोरण आहे? आम्ही कर्मचाऱ्यांमध्ये उद्यमशीलतेस प्रोत्साहन देतो. आमची विक्री योजना अशी आहे ज्यात त्यांना एक उद्योजकाच्या रूपात विकसित केले जाते. ते स्वत: आपल्या कमाईवर निर्णय घेऊन त्या हिशेबाने कामगिरी करू शकतात. आम्ही त्यांना व्यापाराच्या विकासासाठी आवश्यक विक्रीसाठी तयार करतो.

सध्याच्या स्थितीत कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या जास्त आहेत ? आगामी वर्षात कोणता बदल असेल? दरवर्षी ५ लाखांहून जास्त एजंट आयुर्विमा कंपनीद्वारे नियुक्त केले जातात आणि आयुर्विम्याच्या विक्रीत हे आवश्यक आहे. आयुर्विमा उत्पादकांच्या वितरणात नव्या पद्धती वापरल्या जात आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post