मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं : उद्धव


माय नगर वेब टीम

मुंबई - दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये जे वक्तव्य केलं ते करायला नको होतं असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्याचमुळे सगळी चर्चा फिस्कटली. मी मित्रपक्षाला मित्रपक्षच मानतो शत्रूपक्ष मानत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दिवाळीनिमित्त झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत आणि युतीच्या वाटाघाटीबाबत एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य योग्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली त्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.
पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पत्रकारांना भाऊबीजेच्या दिवशी दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आलं होतं. त्यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं.

दरम्यान आज शिवसेनेच्या विधीमंडळाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दिवाळीच्या दिवशी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. माझं अमित शाह यांच्यासोबत जे काही ठरलं आहे ते करावं आम्ही स्थिर सरकार देऊ. मी मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. मला खात्री आहे सगळं काही सुरळीत होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post