माय नगर वेब टीम
अहमदनगर - कलकत्ता येथे होणार्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेसाठी नगरच्या कु. दिशा राजेंद्र जासुद व निधी रविंद्र तिरमल या विद्यार्थिनींची निवड झाली असून या यशाबद्दल त्यांचा शहर बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा, संचालक संजय घुले, अशोक कानडे, डॉ. विजय भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तन्वीर खान, विशेष कार्यकारी अधिकारी जवाहर कटारिया, उमेश झोटींग, रविंद्र तिरमल, वासंती तिरमल, राजेंद्र जासूद, भाऊसाहेब विधाटे, बजरंग पवार, निलेश हाडाळे, आप्पा लढाणे, ऋतुजा गिते, आदी उपस्थित होते. स्कूल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने दि.3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान कलकत्ता येथे शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धा होणार आहेत. नगरच्या यशश्री ऍकॅडमीची दिया जासूद व तक्षीला स्कुलची निधी तिरमल यांची सीबीएसई वेल्फेअर संघात निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडू श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने महावीर म‘खांब आणि योगा ट्रेनिंग सेंटरच्या खेळाडू असून योगा अणि रोप म‘खंब या खेळाचा त्या सराव करतात.
त्यांच्या या यशाबद्दल बोलताना शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात शिकण्यासाठी शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रामध्ये सहभाग आवश्यक आहे. जीवनामध्ये संघर्ष केला तरच यश मिळते. नगरच्या या दोन्हीही खेळाडुंनी अतिशय कमी वयात मोठे यश संपादन केले आहे. यामागे त्यांच्यातील जिद्द आणि परिश्रम आहेत. त्यांनी नगरचा नावलौकीक वाढवला असून राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत तो अधिक उंचवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Post a Comment