साकळाई योजनेवरून शेतकरी आक्रमक; तातडीने काम सुरू करण्याची मागणी

 


खडकी येथे शेतकरी - साकळाई योजना कृती समितीची बैठक 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर – साकळाई उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने मार्गी लावावे, या मागणीसाठी लाभधारक शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र आज खडकी येथे पाहायला मिळाले. साकळाई कृती समिती व शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज सकाळी पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करत प्रशासन आणि सरकारवर नाराजी व्यक्त केली.

साकळाई योजनेसाठी सर्व्हे पूर्ण होऊन एक हजार कोटींपेक्षा अधिक निधीचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षांपासून या योजनेचे भूमिपूजन लवकरच होईल, असे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम संपत चालला असून ते पुन्हा आक्रमक झाले आहेत.

योजनेच्या कामाला तात्काळ सुरुवात न केल्यास उपोषण,  रस्तारोको, रेल्वे रोको आंदोलन करण्याचा  इशारा शेतकऱ्यांनी दिला. “आता आश्वासन नको, काम सुरू झाले पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अन्यथा सरकारवरील विश्वास उडेल,” असा संतप्त सूर बैठकीत उमटला.



दरम्यान, साकळाई कृती समितीच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे योजनेबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

गेल्या 35 ते 40 वर्षांपासून शेतकरी साकळाई योजनेसाठी पाठपुरावा करत आहेत. यापूर्वी पाणी उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत होते. मात्र, आता डॉ. सुजय विखे पाटील यांनी योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे कागदोपत्री दाखवल्यामुळे योजणेबाबत मोठी आशा निर्माण झाली आहे. यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही नमूद करण्यात आले.

यावेळी साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, सभापती भैय्या लगड, प्रतिभाताई दस, नारायण रोडे, गोवर्धन कार्ले, तुकाराम परतराव काळे, तुकाराम बंशी काळे, रोहिदास उदमले, सोमनाथ धाडगे, सुरेश काटे, सरपंच भाऊसाहेब बहिरट, शरद कोठुळे, सुनील कोठुळे सर,  रावसाहेब कोठूळे, नवनाथ कोठुळे, चेअरमन शिवाजी बहिरट, सदाशिव मारुती कोठुळे, नाथा मारुती कोठुळे, भाऊसाहेब उरमुडे, कांतीलाल निकम पाटील, अरुण कोठुळे, अशोकराव कोठूळे, उत्तम कोठुळे, रतन बहिरट हे उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे मानले आभार

गेल्या 35/40 वर्षांपासून साकळाई योजनेसाठी शेतकरी पाठपुरावा करत आहेत. आतापर्यंत पाणी शिल्लक नसल्याचे कारण दिले जातं होते. होते परंतु आता कागदावरील पाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साकळाई योजनेसाठी दिले आहे. त्यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. योजनेसाठी सर्व्हे होऊन आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून योजनेचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे. विखे पाटील यांनी केलेल्या पाठपूराव्याबद्दल कृती समितीच्यावतीने विखे पाटील यांचे आभार मानले. तसेच योजनेचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची विनंती केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post