रणसंग्रामात घडला ‘महासंग्राम’




माय नगर वेब टीम

संगमनेर - एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यास अश्‍लील शेरेबाजी करणे काँग्रेसच्या दोन पदाधिकार्‍यांना भलतेच महागात पडले. त्यांच्याविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘रणसंग्राम’ कार्यक्रमात हा ‘महासंग्राम’ काल मंगळवारी घडला.

संगमनेर विधानसभा निवडणूक सुरू असताना तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात कुणाची सत्ता येणार? सत्ताधार्‍यांनी कोणता विकास साधला? तर विरोेधकांची कोणती भूमिका यावर एका वृत्तवाहिनीने संगमनेरात सत्ताधारी व विरोधक यांना आमने-सामने घेत जनतेचा कौल जाणूून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार्यक्रमाच्या प्रारंभी आयोजित कार्यक्रमस्थळी संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ धोंडीबा अरगडे व जिल्हा परिषद सदस्य रामहरी मोहन कातोरे यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यावर अश्‍लील शेरेबाजी केली.

ही शेरेबाजी त्यांच्या पाठीमागे बसलेल्या सदर महिलेच्या पतीने ऐकली. पतीने संतप्त होवून काँग्रेसच्या या दोन पदाधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यात कार्यक्रमासाठी आलेल्या भाजप-सेनेच्या पदाधिकार्‍यांनी देखील सदर महिलेच्या पतीला साथ देत महिलेवर अश्‍लील शेरेबाजी करणार्‍या त्या दोन काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. वातावरण चांगलेच तापले. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर सदर महिला व तिच्या पतीने भाजप-सेनेच्या पदाधिकार्‍यांसह संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. संबंधीत दोघांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी भाजप-सेना पदाधिकार्‍यांनी केली. जमाव संतप्त होवू लागला. अखेर शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी प्रथम सदर महिला व तिच्या पतीशी बंद खोलीत झाला प्रकार जाणून घेतला.

त्यानंतर उपस्थित भाजप-सेनेच्या पदाधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली. भाजप-सेनेचे पदाधिकारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. अखेर महिला पदाधिकार्‍याच्या पतीने फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, मालपाणी हेल्थ कल्ब येथे मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाच्या प्रारंभी फिर्यादीच्या पत्नीला नवनाथ धोंडीबा अरगडे व रामहरी मोहन कातोरे यांनी अश्‍लील शब्दात दोघांत संभाषण केले. ते फिर्यादीने स्वत: ऐकले. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अरगडे व कातोरे या दोघांविरुध्द भारतीय दंड संहिता 294, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. कवडे करत आहे.

राजकीय द्वेषातून कुटील डाव
यांना न्याय द्यावा व खोटे आरोप करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रताप उर्फ बाबा ओहोळ यांनी शहर पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी काँंग्रेसचे शहराध्यक्ष विश्‍वास मुर्तडक यांच्यासह काँग्रेस व युवक काँंग्रेस, एनएसयुआयचे कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post