आ.खडसेंचे नाव पहिल्या यादीत न आल्याने भाजपा सरकारचा निषेध
माय नगर वेब टीम
भुसावळ – माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे गेल्या ४० वर्षापासून भाजपा आहे. त्यांनी महाराष्ट्रात भाजपाचे पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे. जे.आजपर्यंत तिकिट वाटपाचे कार्य निष्ठेने करीत होते. त्यांचेच नाव आज भाजपाच्या पहिल्या यादीत न आल्याने मी भाजप सरकारचा निषेध करतो असे प्रतिपादन भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब प्रमुख रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
येथील सोनिच्छा वाडीतील हॉटेल मल्हार येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रसंगी डॉ. नरेंद्र कोल्हे, ऍड. प्रकाश पाटील, सुहास चौधरी, डॉ. बाळू पाटील, मंगला पाटील, अरती चौधरी, गिरीष नारखेडे, रमेश पाटील आदी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातील लेवा पाटीदार विखुरले आहे. आ.खडसे गेल्या ४० वर्षापासून भाजपात आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून त्यांना त्रास दिला जात आहे. त्यातच भाजपाने विधानसभा निवडणूक जाहिर केलेल्या पहिल्या यादीत नाभाभाऊंचे नाव न येणे याची खंत वाटते.
भाजपाने नाथाभाऊंचे नाव सन्मानपुर्वक पुढील यादीत घ्यावे अशी विनंती आपण सरकारला करीत आहोत. पुढील यादीत नाव न घेतल्यास भोरगाव पंचायत समाज कार्यकर्त्यांना बोलाऊन काय निर्णय घ्यायचा तो घेवू असा सुचक इशाराही कुटुंबनायक रमेश पाटील यांनी दिला.
आजपर्यत लेवा समाज नाथाभाऊंसोबत पर्यायाने भाजपासोबत खबीरपणे उभा राहिला आहे. मात्र भाजपाने आ.खडसेंसोबत दगा फटका केला आहे, असे आम्ही मानतो. हा भाजपावर दबाव नाही, परंतू खडसेंवर अन्याय म्हणजे सर्व लेवा समाजावर अन्याय आहे. आजपर्यंत नाथाभाऊंनी पक्षातर्फे तिकीट वाटप केले मात्र आज त्यांच्यावर हि वेळ आली म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला असेही रमेश पाटील यांनी सांगितले.
Post a Comment