पाकला झटका; निजामाचा ३०६ कोटींचा खजिना भारताला मिळणार





माय नगर वेब टीम
ब्रिटनच्या एका कोर्टाने भारताच्या बाजूने एक मोठा निर्णय देत पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. ७० वर्षे जुन्या प्रकरणात ३५ मिलिअन पौंड अर्थात ३०६.२५ कोटी रुपयांच्या हैदराबादच्या निजामाच्या खजिन्यासंदर्भात कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे.
या कोर्टाने पाकिस्तानच्या दाव्यांना नाकारत याला परिस्थितीचा दुरुपयोग केल्याचे म्हटले आहे. कोर्टाने म्हटले की, हैदराबादच्या निजामाचे वंशज आणि भारताचा या खजिन्यावर अधिकार आहे. पाकिस्तानसरकार विरुद्ध निजामाचे शेवटचे वंशज मीर उस्मान अली खान, भारत सरकार आणि भारताचे राष्ट्रपती यांच्यावतीने लंडनच्या कोर्टात हा खटला सुरु होता.
हैदराबादच्या शेवटचा निजामाने सन १९४८ मध्ये लंडनच्या नेटवेस्ट बँकेमध्ये १० लाख पौंड त्यावेळचे तब्बल ८ कोटी ८७ लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम आजच्या काळात ३०६.२५ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी निजामाच्या वंशजांचे म्हणणे आहे की, १९४८ मध्ये हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मीर वनाज जंग यानी निजामाच्या परवानगीशिवाय लंडमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांच्या बँक खात्यामध्ये १० लाख पौंड जमा केले होते. यावरुन पाकिस्तानकडून आजवर या रकमेवर आपला अधिकार सांगण्यात येत होता.
भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर पाकिस्तान अस्तित्वात आला होता. मात्र, त्यावेळी हैदराबादच्या निजामाला पाकिस्तानसोबत जायचे होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कडक भुमिकेमुळे निजाम दुसरा पर्यायही शोधत होता. त्यामुळे या तणावाच्या परिस्थितीत निजामाने आपला सर्व खजिना पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या खात्यात जमा केला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post