कपिल देव यांचा बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा राजीनामा
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) राजीनामा दिला आहे. ते या समितीचे प्रमुख होते. त्यांनी ईमेलद्वारे आपल्या राजीनाम्याचा निर्णय बोर्डाला कळवला.
दुहेरी हितसंबंधाच्या तक्रारीवरून बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी त्यांना नोटीस पाठवली होती. भारतीय पुरुष आणि महिला संघाचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीवर होती. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रशिक्षक पदासाठी उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. त्यानुसार या समितीने रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी फेरनिवड केली होती. या समितीत अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा समावेश होता.
Post a Comment