नगर: महापौर वाकळेंनी घेतला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज





माय नगर वेब टीम
अहमदनगर – भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज अचानक आमदारकीचा अर्ज घेतला. त्याअर्थी ते बंडखोरी करून अर्ज दाखल करतील अशी माहिती सूत्रांनी दिली. वाकळे यांच्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी तर आ. जगतापांच्या पथ्यावर पडेल असे चित्र आहे. वाकळे हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापालिकेत महापौर पदावर विराजमान झाले होते.

१४ नगरसेवकांच्या जोरावर भाजपने महापौरपदाची खुर्ची मिळविली. त्यासाठी राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांचे पाठबळ भाजपला मिळाले. २४ नगरसेवक असूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर रहावे लागले. तेव्हापासूनच स्थानिक भाजप आणि शिवसेनेत वितुष्ठ आले. वाकळे यांच्या प्रत्येक निर्णयाला शिवसेनेने आडेहात घेत विरोध केला. या सगळ्या घडामोडी पाहता वाकळे हे बंडखोरी करतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.

विधानसभेच्या निवडणुकीला सेना-भाजप युतीने सामोरे जात असून युतीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. नगर शहराची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली असून उपनेते अनिल राठोड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र राठोड यांच्या उमेदवारीला माजी खासदार दिलीप गांधी यांनी उघडपणे विरोध दर्शविला आहे. दिलीप गांधी यांची नाराजी दूर करण्यासाठी बुधवारी शिवसेनेचे नेते त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी मनधरणी सुरू असतानाच इकडे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. त्यामुळे गांधींची मनधरणी करावी की वाकळेंना आवरावे असा पेच शिवसेनेचे उमेदवारी अनिल राठोड यांच्यासमोर आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post