नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी उमेदवारीचे अर्ज दाखल
माय नगर वेब टीम
अहमदनगर - विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेण्यासाठी व भरण्यासाठी गर्दी केली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने झुंबड उडणार आहेत.
आज गुरूवारी जिल्ह्यातून अहमदनगर शहर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप, तर शिवसेनेकडून अनिल राठोड, अपक्ष संदिप सकट, कम्युनिस्ट पार्टीकडून बहिरूनाथ वाकळे, अपक्ष संजय कांबळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला, तर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. तसेच नेवासा मतदार संघातून बाळासाहेब मुरकुटे, मच्छिंद्र मुंगसे, भाऊसाहेब जगदाळे, शंकरराव गडाख, विठ्ठल देशमुख, तर कर्जत- जामखेड मधून रोहित पवार, कोपरगाव मतदार संघातून स्नेहलता कोल्हे, राजेश परजणे, खाटीक अल्लाउद्दीन समशुभाई, बाळकृष्ण दिक्षित, अशोक गाायकवाड, शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील, अल्ताफ इब्राहिम शेख, श्रीगोंदा मतदार संघातून बबनराव पाचपुते, पाथर्डी-शेवगाव मतदार संघात मोनिका राजळे, जि.प. सदस्या हर्षदा काकडे, किसन चव्हाण, अमोल गर्जे, श्रीरामपुर मतदार संघातून अशोक जगधने, भाऊसाहेब पगारे, सुधाकर भोसले, चेतन लोखंडे, रामचंद्र जाधव, संगमनेर मतदाारसंघातून अपक्ष शोभा संजय फड, अकोले मतदार संघातून डॉ. किरण लहामटे, दिपक पथवे, वैभव पिचड यांनी अर्ज दाखल केले आहेत.
Post a Comment