मुंबई - विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. मात्र सर्वसामान्यांना उत्सुकता आहे, ती म्हणजे प्रतिज्ञापत्रानुसार उमेदवारांची संपत्ती किती आहे. याच माध्यमातून कोण नेता किती श्रीमंत आहे, याचा अंदाज नागरिकांना येतो. मात्र सध्याच्या घडीला सर्वजण वाट पाहत आहेत ती ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य युवानेते आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती आहे.
आदित्य ठाकरेंच्या नावे ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती
आदित्य ठाकरे कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. आदित्य ठाकरेंच्या नावे ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. आदित्य ठाकरेंनी पेशाने व्यावसायिक असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवी आहेत. २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडे सहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक आहे. ६४ लाख 65 हजारांच्या सोन्याचा यामध्ये समावेश आहे. तर १० लाख २२ हजार अशी एकूण ११ कोटी 3 ३८ लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.
भाजपचे मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार
आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणार्या उमेदवारांमध्ये भाजपचे मलबार हिलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी एकूण ४४१ कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर २८३ कोटींचं कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
Post a Comment