‘सेम टू सेम’ शाहरुख सारखा दिसणारा व्यक्ती पाहिलात का?
माय नगर वेब टीम
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चाहते असल्याचे पाहायला मिळते. अनेक वेळा हे चाहते आपल्या आवडत्या कलाकाराची ड्रेसिंग स्टाईल, बोलण्याची पद्धत फॉलो करताना दिसतात. बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानची स्टाईल आणि लूक चाहते सर्वाधिक फॉलो करत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच शाहरुखच्या अशाच एका चाहत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमधील व्यक्ती हुबेहुब शाहरुख खानसारखा दिसत आहे. त्यामुळे त्याचा सोशल मीडियावर तगडा चाहता वर्ग निर्माण झाला असून अनेक चाहते त्याला शाहरुख खान समजून त्याच्यासोबत फोटो कढताना दिसत आहे. या व्यक्तीला पाहता जगात एकाच व्यक्तीसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती असे म्हणायला हरकत नाही आहे.
या व्यक्तीचे नाव अकरम-अल-इसावी असे आहे. अकरम हे पेशाने फोटोग्राफर आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने तर शाहरुख खानची डुप्लीकेट कॉपी असे म्हटले आहे.
Post a Comment