धक्कादायक! प्रसिद्ध वकील ताकेंसह दोघांची निर्घृण हत्या


माय नगर वेब टीम
अहमदनगर – जिल्हा न्यायालयातील सुप्रसिद्ध अ‍ॅड. संभाजी ताके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी, अशा दोघांची नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती गाव येथे निघृण हत्या झाली आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी शरद शिवाजी ताके यांस अटक केली आहे. कुऱ्हाड जप्त केली आहे.

अ‍ॅड. ताके हे पत्नी आणि दोन मुलांसह भिंगार शहरानजीक असलेल्या नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील सौरभनगर कॉलनी येथे राहतात. अ‍ॅड. ताके यांचे जेऊर हैबती हे मूळ आहे. ते आज गावाकडे काही कामानिमित्त गेले होते. तेथे त्यांच्या जमिनीचे वाद असून, ते प्रकरण नेवासे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.



अ‍ॅड. ताके यांच्याबरोबर असलेल्या सहकार्‍याची ओळख अजून पटलेली नाही. कुर्‍हाडीने त्यांच्यावर हल्ला झाला असून, घटनास्थळी मोटारगाडी आढळल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळाचा पंचनामा नेवासे पोलिसांकडून सुरू आहे. अ‍ॅड. ताके यांच्या हत्येची माहिती नगरसह भिंगार शहरात वार्‍यासारखी पसरल्याने खळबळ उडाली आहे. नगर आणि भिंगारमधील ताके यांच्या मित्रपरिवाराने नेवाशाकडे धाव घेतली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post