जिओची दिवाळी भेट; अवघ्या ६९९ रुपयांत मिळणार ‘हा’ फोन






माय नगर वेब टीम


सगळ्यांनाच दसरा दिवाळीचे वेध लागले आहेत. अनेकजन खरेदीसाठी उत्सुक झाले असून बजेट फोन घेण्याकडेही अनेकांचा कल याकाळात आहेत. अशातच जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी १५०० रुपयाच्या फोनवर भरघोस सुट दिली असून हा फोन अवघ्या सातशे रुपयांत मिळणार आहे. ऑफर जाहीर केल्यानंतर ग्राहकांमध्ये सध्या या फोनची जोरदार चर्चा सुरु आहे.

विशेष म्हणजे, या फोनमध्ये दिवाळी २०१९ ऑफरमार्फत जिओ ७०० रुपये किंमतीचा डेटादेखील बोनस स्वरुपात देणार आहे. यामध्ये ग्राहकांना जिओकडून पहिल्या ७ रिचार्जसाठी प्रत्येकी ९९ रुपयांचा डेटा दिला जाणार आहे.

ही ऑफर जाहीर करताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, की, भारतीयांना परवडणाऱ्या इंटरनेट आणि डिजिटल क्रांतीच्या लाभापासून कुणीही भारतीय वंचित राहू नये असा यामागचा उद्देश आहे.

‘जिओफोन दिवाळी गिफ्ट’ ऑफर करून, आम्ही प्रत्येक नवीन व्यक्तीला इकॉनॉमिक पिरॅमिडच्या तळापासून इंटरनेट इकॉनॉमीमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी डिजिटल इंडिया मिशनच्या यशासाठी हे एक नवे पर्व आहे.

जिओफोनवर ८०० रुपयांची बचत आणि ७००  रुपये किंमतीचा डेटा, म्हणजेच एकूण १५०० रुपयांचा मोठा फायदा ग्राहकाला मिळणार आहे.

जिओ लॉन्च झाल्यापासून, जवळजवळ ७ कोटी २ जी युजर्स जिओच्या फोर जी प्लॅटफॉर्मवर आले आहेत. अजून ३५ कोटी भारतीयांकडे स्मार्टफोन नाहीत. ते आपल्या देशातील सर्वात वंचितांमधील आहेत. त्यांचे स्मार्टफोनचे स्वप्न साकार व्हावे यासाठी जिओ प्रयत्नशील असल्याचे याप्रसंगी कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post