विधानसभेसाठी भाजपचा प्रचारसभांचा धडाका; मोदी आणि शाह घेणार इतक्या सभा




माय नगर वेब टीम
मुंबई - विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरणात गरमागरमी पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षाने मतदार राजावर प्रभाव पाडण्यासाठी विविध तंत्र वापरण्याची युक्ती लढवली आहे. या साऱ्या वातावरणात भाजपाकडून लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा मोदी कार्डाचा वापर करण्यात येणार आहे.

आगामी निवडणुकांसाठीचं पूरक वातावरण पाहता, भाजपाकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांना संबोधित करणार आहेत. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार मोदी एकूण १० प्रचारसभा घेणार आहेत. तर, अमित शाह २० प्रचारसभांमध्ये सहभागी होणार आहेत.

भाजपकडून या प्रचारसभांचं नियोजन करण्यात आलं आहे. पण, त्याचं वेळापत्रक मात्र समोर आलेलं नाही. असं असलं तरीही विरोधकांसाठी मात्र आता या प्रचारसभा आव्हान देणाऱ्या ठरणार हे खरं. कारण, भाजपाकडून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा मोदी कार्डाचा वापर करण्य़ात येणार आहे. ज्यामध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा मुद्दा आणि जम्मू काश्मीर मुद्दा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post