पाकिस्तानचे निमंत्रण मनमोहन सिंग नाकारणार



नवी दिल्ली : कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनासाठी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. मात्र, मनमोहन यांच्याकडून पाकिस्तानचे निमंत्रण झिडकारले जाण्याची शक्‍यता आहे.
भारतीय शीख यात्रेकरूंसाठी पाकिस्तान 9 नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉर खुला करणार आहे. त्या मार्गामुळे पाकिस्तानमधील कर्तारपूर आणि भारताच्या पंजाबमधील गुरूदासपूर जिल्हा जोडला जाणार आहे. त्या कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी मनमोहन यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी यांनी सोमवारी दिली. 

तो कार्यक्रम पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यामध्ये वैयक्तिक रस दाखवला आहे. मनमोहन यांच्याविषयी आम्हाला मोठा आदर आहे. त्याशिवाय, ते शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचे कुरेशी यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post