लंडनमधील २७ मजली इमारत आगीच्या विळख्यात

माय नगर वेब टीम
लंडन - बुधवारी सकाळी लंडनच्या लाटिमर रोडवरील ग्रेनफेल टॉवर या २७ मजली इमारतीला भीषण आग लागली असून अनेक नागरिक आत अडकले गेले आहेत. आग अतिशय वेगाने पसरल्याने सर्वत्र जाळ दिसत होता, तातडीने अग्निशमन दलाचे ४० बंब व २०० कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी तैनात केले गेले आहेत. इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत.

आगीचा जोर इतका भयानक आहे की इमारतीचा कांही भाग जळून खाक झाला आहे व त्यामुळे इमारत एका बाजूला कलली आहे. इमारतीचा कांही भाग जळून कोसळू लागला असल्याने सुटका पथकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या इमारतीत १२० फ्लॅटस आहेत. इमारतीचे २४ मजले आगीने वेढले गेले असून आग लागण्याचे कारण अद्यापी समजू शकलेले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post