ई-पेमेंट अयशस्वी झाल्यास बँका देणार दररोज शंभर रुपये
नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा काही कारणास्तव ट्रान्झॅक्शन फेल होतात. परंतु, आता ट्रान्झॅक्शन अयशस्वी झाल्यास व ते पैसे एका दिवसात परत न दिल्यास बँक तुम्हाला दररोज १०० रुपये देणार आहे. यासंबंधी आरबीआयने एक नोटीस जाहीर केली आहे.
नोटिसीनुसार, एका दिवसाच्या आत ग्राहकाला पैसे परत मिळाले नाहीतर बँक आणि डिजिटल वॉलेटला दररोज १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. हे नवे नियम यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), इमीडिएट पेमेंट सिस्टम(IMPS), ई-वॉलेट्स, कार्ड टु कार्ड पेमेंट, नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस (NACH) यावर लागू होणार आहेत.
Post a Comment