या 13 चुका केल्या असतील तर एच. आय. व्ही. रक्तचाचणी करून घेतली पाहिजे
एच.आय.व्ही. संसर्गासाठी जोखमीच्या म्हणून समजण्यात येणा-या प्रसंगात संपर्क आलेल्या लोकांनी एच. आय. व्ही. रक्तचाचणी करून घेतली पाहिजे. एच. आय. व्ही. विषाणू प्रामुख्याने तीन माध्यमांद्वारे परसतो. ती माध्यमे म्हणजे :
असुरक्षित लैंगिक संबंध.
एच. आय. व्ही. चाचणी न केलेले रक्त किंवा रक्त घटक घेणे.
शिरेवाटे घेण्यात येणा-या मादक पदार्थांचे सेवन करताना सुई व सीरिजचा सामूहिक वापर करणे.
एच. आय. व्ही. बाधित मातेकडून तिच्या जन्मणाच्या बाळास संक्रमणाची ही माध्यमे विचारात घेऊन खालील प्रवर्गातील व्यक्तींची एच . आय . व्ही . रक्तचाचणी करणे गरजेचे ठरते.
एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असणा -या व्यक्ती.
लैंगिक संबंधातून पसरणारे आजार व गुप्तरोग झालेल्या व्यक्ती.
शीरेतून मादक पदार्थ टोचून घेण्यासाठी सुईचा व सीरिजचा सामायिक | वापर करणा-या व्यक्ती.
रक्तसंक्रमणातून एच. आय. व्ही . विषाणूसाठी चाचणी न केलेले रक्त | प्राप्त झालेल्या व्यक्ती.
एच. आय. व्ही. बाधित स्त्रीपासून जन्मलेली बालके.
एच. आय. व्ही. बाधित व्यक्तीचे लैंगिक जोडीदार.
बलात्काराला बळी पडलेल्या व्यक्ती.
एच. आय. व्ही. बाधित ज्ञात व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीचा एच. आय. व्ही. संसर्गाबाबतचा दर्जा ज्ञात नाही, अशा व्यक्तीची शुश्रूषा करीत असताना अपघाताने सुई टोचून इजा झालेल्या आरोग्य सेवा पुरविणा-या व्यक्ती.
एड्सशी निगडित असलेल्या रोगांची लक्षणे असलेल्या व्यक्ती.
Post a Comment