फिटनेस विअरेबल खरेदी करण्याआधी हे जाणून घ्या...




पावसानंतर हंगाम येतो तो तब्येत चांगली करण्याचा म्हणजे थंडीचा. तुम्हाला फिटनेस विअरेबल खरेदी करण्याची इच्छा असेल तर या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या...


1. आरामदायक असावे कारण ते तुम्ही अनेक तास घालणार आहात. ते घातल्याने असुविधा होऊ नये. विअरेबलमध्ये जो स्ट्रॅप आहे तो त्वचेला सूट करेल की नाही हेही तपासून पाहा.


2. हार्ट रेट मॉनिटरिंगबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. वर्कआउट मोडमध्ये गरज असेल हार्ट रेट सतत मॉनिटर करण्याची. तेव्हाच वर्कआउटमध्ये किती कॅलरी बर्न केल्या आहेत हे तुम्हाला चांगले कळू शकेल.


3. योग्य रूट ट्रॅकिंगसाठी जीपीएसचे महत्त्व आहे. रनिंग, सायकलिंगसारख्या वर्कआउट्समध्ये त्याद्वारे अंतर समजेल. प्रत्येक डिव्हाइसमध्ये अचूक जीपीएस चिप नसते. त्यामुळे खरेदीआधी फिटनेस विअरेबलचा रिव्ह्यू अवश्य वाचा.


4. बॅटरी लाइफ महत्त्वाचे आहे. बेसिक फिटनेस ब्रँड्सच्या प्रॉडक्ट्सची बॅटरी आठवडाभर चालली तर चांगलेच आहे. स्मार्ट वॉचची बॅटरी साधारण दोन दिवस चालते. फिटनेस वॉचची बॅटरी किमान चार दिवस चालणारी असावीच.


5. डिव्हाइसचा डिस्प्ले खूप सुविधाजनक असावा. सूर्याच्या प्रखर प्रकाशातही पाहण्यास अडचण येऊ नये. डेटा मोठ्या अक्षरात दिसतो की नाही, फॉन्ट्स वाचण्यास स्वच्छ आहे की नाही... याकडे लक्ष द्या.


6. डिव्हाइसवर नोटिफिकेशन्स येत असतील तर ते फक्त व्हायब्रेट करते की फक्ट डेटा दाखवते हे तपासा. कॉलर आयडी फीचर खूप महत्त्वाचे आहे. कॉल करणाऱ्याचे नाव आणि नंबर त्यात दिसतो की नाही हे पाहा.


7. जर तुम्ही स्विमर नसाल तर विअरेबल स्विम-प्रूफ असण्याची गरज नाही. वॉटरप्रूफ विअरेबल असल्यात पावसात किंवा शॉवरमध्ये काढून ठेवण्याची गरज नाही. वॉटरप्रूफ विअरेबल असेल तर घामाचाही त्यावर फरक पडणार नाही

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post