संगमनेरमधून भाजपाचे पिछेमूड ; जागा शिवसेनेकडेच


माय नगर वेब टीम
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याचं जाहीर केल्यानंतर शिवेसना-भाजपाचा युतीचा फॉर्म्यूलाही अखेर जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाकडून आज अधिकृतपणे १२५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी आपण कोणत्या जागांवर लढणार आहोत हे जाहीर केलं आहे. नव्या फॉर्म्युलानुसार, शिवसेना १२४ जागांवर लढणार आहे. तर दोन जागा त्यांना विधान परिषदेवर अधिकच्या दिल्या जातील. तर दुसरीकडे भाजपा आणि मित्रपक्ष १६४ जागांवर लढणार असल्याचं नक्की झालं आहे. दरम्यान नगरमधील नगर, श्रीरामपूर, पारनेरसह संगमनेरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे तेथून भाजपाला पिछेमूड करण्याची वेळ आली आहे. संगमनेरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात ना. विखे यांनी कंबर कसली आहे.

दरम्यान भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना अनेक महत्त्वाच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मंदा म्हात्रे, विद्या ठाकूर, मनिषा चौधरी, शिवेंद्रराजे भोसले, मुक्ता टिळक अशा महत्त्वाच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुणे शहरातील आठही जागा भाजपाने आपल्याकडे ठेवल्या असून शिवसेनेला एकही जागा देण्यात आली नाही.

शिवसेनेच्या वाट्याला आलेले मतदारसंघ –
अक्कलकुवा (अज), धुळे शहर, चोपडा (अज), जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, बुलढाणा, सिंदखेडराजा, मेहकर (अजा), बाळापूर, रिसोड, बडनेरा, तिवसा, अचलपूर, देवळी, ब्रह्मपूरी, वरोरा, दिग्रस, हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर (अजा), वसमत, कळमनुरी, परभणी, गंगाखेड, घनसावंगी, जालना, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम (अजा), पैठण, वैजापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, कळवण (अज), येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी (अज), देवळाली (अजा), इगतपूरी (अज), पालघर (अज), बोईसर (अज), नालासोपारा, वसई, भिंवडी ग्रामीण (अज), शहापूर (अज), भिंवडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ (अजा), कल्याण ग्रामीण, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, चांदिवली, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्ती नगर, चेंबूर, कुर्ला (अजा), कलीना, वांद्रे पूर्व, धारावी (अजा), माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, कर्जत, उरण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, पुरंदर, भोर, पिंपरी (अजा), संगमनेर, श्रीरामपूर (अजा), पारनेर, अहमदनगर शहर, बीड, लातूर ग्रामीण, उमरगा (अजा), उस्मानाबाद, परांडा, करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ (अजा), सोलापूर शहर मध्य, सांगोले, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, सावंतवाडी, चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले (अजा), शिरोळ, इस्लामपूर, पळूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ हे मतदारसंघ शिवसेनेकडे आले आहे.


शिवसेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवार –
नांदेड दक्षिण – राजश्री पाटील, मुरुड – महेंद्र शेठ दळवी, हदगाव – नागेश पाटील आष्टीकर, मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ, भायखळा – यामिनी जाधव, गोवंडी – विठ्ठल लोकरे, एरोंडेल/ पारोळा – चिमणराव पाटील, वडनेरा – प्रीती संजय, श्रीवर्धन – विनोद घोसाळकर, कोपर पाचकपडी – एकनाथ शिंदे, जापूर – रमेश बोरनावे, शिरोळ – उल्हास पाटील, गंगाखेड – विशाल कदम, दापोली – योगेश कदम, गुहागर – भास्कर जाधव, अंधेरी पूर्व – रमेश लटके, कुडाळ – वैभव नाईक, ओवला माजीवाडे – प्रताप सरनाईक, बीड – जयदत्त क्षीरसागर, पार ठाणे – सांदीपान भुमरे, शहापूर – पांडुरंग बरोला, नगर शहर – अनिलभैय्या राठोड, सिल्लोड – अब्दुल सत्तार, औरंगाबाद (दक्षिण) – संजय शिरसाट, अक्कलकुवा – आमशा पडवी, इगतपुरी – निर्मला गावित, वसई – विजय पाटील, नालासोपारा – प्रदीप शर्मा, सांगोला – शाबजी बापू पाटील, कर्जत – महेंद्र थोरवे, धन सावंगी – डॉ.हिकमत दादा उधन, खानापूर – अनिल बाबर, राजापूर – राजन साळवी, करवीर – चंद्रदीप नरके, बाळापूर – नितीन देशमुख, देगलूर – सुभाष सबणे, उमरगा लोहारा – ज्ञानराज चौगुले, डिग्रस – संजय राठोड, परभणी – डॉ.राहुल पाटील, मेहकर – डॉ.संजय रायमुलकर, जालना – अर्जुन खोतकर, कळमनुरी – संतोष बांगर, कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर, औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट, चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर, वरळी – आदित्य ठाकरे, शिवडी – अजय चौधरी, इचलकरंजी – सुजित मिणचेकर, राधानगरी – प्रकाश आबिटकर, पुरंदर – विजय शिवतारे, दिंडोशी – सुनील प्रभु, जोगेश्वरी पूर्व – रवी वायकर, मागठाणे – प्रकाश सुर्वे, गोवंडी – विठ्ठल लोकरे, विक्रोळी – सुनील राऊत, अनुशक्ती नगर – तुकाराम काटे, चेंबूर – प्रकाश फतारपेकर, कुर्ला – मंगेश कुडाळकर, कलिना – संजय पोतनीस, माहीम – सदा सारवणकर, ळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, पाचोरा – किशोर पाटील, मालेगाव – दादाजी भुसे, सिन्नर – राजाभाऊ वझे, निफाड – अनिल कदम, देवळाली – योगेश घोलप, खेड – आळंदी – सुरेश गोरे, पिंपरी – गौतम चाबुकस्वार, येवला – संभाजी पवार, नांदगाव – सुहास खांडे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post