भाजपच्या १२५ उमेदवारांची पहिला यादी जाहीर; १२ विद्यामान नेत्यांचा पत्ता कट
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान १२ उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमधून पालकमंत्री राम शिंदे, शेवगाव-पाथर्डीतून मोनिका राजळे, कोपरगावमधून स्रेहलता कोल्हे, राहुरीतून शिवाजीराव कर्डिले, नेवाशातून बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
तर राष्ट्रवादीतून आलेले आमदार वैभव पिचड यांना अकोलेतून उमेदवारी तर माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना श्रीगोंद्यात उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये १२ महिला आमदारांचा समावेश आहे. १२ मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
उत्सुकता लागून राहिलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी कसबा पेठेतून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अपेक्षेप्रमाणे साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Post a Comment