माझी उमेदवारी जातीयवादी पक्ष व गुंडगिरीच्या विरोधात ; किरण काळे





माय नगर वेब टीम
अहमदनगर -  नगर शहर गेल्या तीस वर्षापासून विकासापासून वंचित आहे. म्हणूनच आपण नगरकरांना सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठीच विकासापासून वंचित असणार्‍या शहरासाठी वंचित बहुजन  आघाडीची उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. माझी उमेदवारी जातीयवादी पक्ष व गुंडगिरीच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया किरण काळे यांनी दिली आहे.

माझी उमेदवारी कोणाला पराभूत करण्यासाठी किंवा कुणा एकाच्या विरुद्ध नसून जातीयवादी पक्ष आणि शहराचे स्वास्थ्य दहशत, गुंडगिरीच्या प्रवृत्ती विरुद्ध आहे. या शहरात आज पर्यंत दोन नेतृत्वांना या शहरांतील मतदारांनी गेल्या तीस वर्षात संधी दिली. माजी आमदारांना पाच-दहा नव्हे तर तब्बल पंचवीस वर्ष मोठ्या अपेक्षेने संधी दिली होती. परंतु विकास तर दूरच त्यांनी शहराची दुर्दशा करून टाकली असल्याचे काळे यांनी बोलतांना सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post