दोन दिवसांत अक्षय कुमारच्या 'हाउसफुल 4' ने केली 37.89 कोटींची कमाई
माय नगर वेब टीम
मुंबई - अक्षय कुमार स्टारर 'हाउसफुल 4' ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे 19.08 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तसेच दुसऱ्या दिवसाची कमाई 18.81 कोटी रुपये आहे. बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 37.89 कोटी रुपये झाले आहे.
ओपनिंगच्या बाबतीत अक्षयच्या मागील 4 चित्रपटांपेक्षा आहे मागे...
जर अक्षय कुमारच्या करिअरबद्दल बोलायचे तर पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत 'हाउसफुल 4' त्याच्या पहिल्या चार हिंदी चित्रपटांपेक्षा मागे आहे. त्याच्या बॉलिवूड करिअरचा सर्वात मोठा ओपनर 'मिशन मंगल' आहे, ज्याने पहिल्या दिवशी 29.16 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. 'हाउसफुल 4' या लिस्टमध्ये 6 व्या क्रमांकावर येतो.
अक्षयचे टॉप 5 सर्वात मोठे ओपनर चित्रपट...
चित्रपट पहिल्या दिवसाचे कलेक्शन
1 मिशन मंगल - 29.16 कोटी रुपये
2 गोल्ड - 25.25 कोटी रुपये
3 केसरी - 21.06 कोटी रुपये
4 सिंह इज ब्लिंग- 20.67 कोटी रुपये
5 2.0 (हिंदी व्हर्जन) - 20.25 कोटी रुपये
नोट : अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर '2.0' चे सर्व व्हर्जन (हिंदी, तमिळ, तेलगु) ने पहिल्या दिवशी एकूण 81 कोटी रुपये कमवले होते.
यावर्षीचा सर्वात 9 वा सर्वात मोठा ओपनर...
जर यावर्षी आतापर्यंत रिलीज झालेल्या बाकीच्या हिंदी चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनची तुलना केली तर 'हाउसफुल 4' 9 व्या क्रमांकावर येतो. या लिस्टमध्ये ऋतिक रोशन आणि टाइगर श्रॉफ स्टारर 'वॉर' 53.35 कोटी रुपयांच्या कमाईसोबत टॉपवर आहे, तर 10 व्या क्रमांकावर अजय देवगण, अनिल कपूर, अरशद वारसी आणि माधुरी दीक्षित स्टारर 'टोटल धमाल' आहे, ज्याने पहिल्या दिवशी 16.50 कोटी रुपये कमवले होते.

Post a Comment