अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात आयसिसचा म्होरक्या बगदादी ठार; ट्रम्प यांची पत्रकार परिषदेत माहिती



माय नगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयसिस) चा म्होरक्या अबु बकर अल-बगदादी ठार झाला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत याची पुष्टी केली आहे. या अगोदर ट्रम्प यांनी रविवारी सकाळी 'काहीतरी मोठं घडलंय' असे ट्विट केले होते. मात्र ते नेमकं कशाविषयी बोलत आहेत याबाबत काहीही सांगितले नव्हते. ट्रम्प यांच्या ट्विटनंतर ट्रम्प काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याचे व्हाइट हाउस सांगितले होते.

इदलिब प्रांतात अमेरिकी सैन्याचे ऑपरेशन
रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, सिरियाच्या इदलिब प्रांतात अमेरिकेच्या लष्कराने हेलिकॉप्टर, विमान आणि ड्रोन्सच्या संरक्षणाखाली विशेष सैन्य दाखल केले. यानंतर जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु गेली. न्यूजवीकच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच आयसिस विरोधात कारवाई करण्यासाठी मंजूरी दिली होती.

बगदादीने 2014 मध्ये स्वतःला खलफा घोषित केले होते
बगदादीला 2014 मध्ये एका मशीद पाहण्यात आले होते. तेथील एका भाषणादरम्यान त्याने स्वतःला इराक आणि सिरियाचा खलिफा घोषित केले होते. इराक-सिरियामध्ये अमेरिकी आणि त्यांच्या सहयोगी लष्करांनी दीर्घकाळपर्यंत आयसिस विरोधात लढाई लढली. तेव्हा संयुक्त सैन्याच्या कारवाईमध्ये अनेकवेळा बगदादी ठार झाल्याचे वृत्त आले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post